*महत्वाची सूचना*
*महाएक्साम साठी प्रवेश प्रक्रिया*
1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत शासनाच्या scholarship चे फॉर्म्स भरायचे आहेत. जे विद्यार्थी शासनाच्या परीक्षेला बसतील त्याच विद्यार्थ्यांनी Mahaexam ही सराव परीक्षा द्यावी. शासनाच्या परीक्षेच्या एक महिना आधी Mahaexam होईल. राज्यस्तरावर एकाचवेळी सर्व जिल्ह्यातून होणारी ही एकमेव परीक्षा असेल.
राज्य शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेची ही हुबेहूब रंगीत तालीम अतिशय दर्जेदार, अचूक, पारदर्शी, असेल कारण ही परीक्षा NEET/ JEE main/MHTCET या परीक्षांचा 10 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या *डीपर* व *सर फाउंडेशन* या संस्थेचे संकल्पक संस्थापक *श्री हरीश बुटले*यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनातून साकार होत आहे.
तेंव्हा
प्रिय शिक्षक आणि पालक मित्रांनो
या वर्षापासून इयत्ता ५ वी ८ वी स्कॉलरशिप परिक्षा मार्च 2017 मध्ये होणार आहे. त्या परिक्षेच्या पूर्वी *उत्तम सराव परीक्षा* या परिक्षेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीचा महाराष्ट्र राज्यव्यापी लेखाजोखा अंतिम परिक्षेआधीच कळेल.
अशी *राज्यव्यापी सराव परीक्षा* ( State Level Moke Exam ) रविवार दि. ५ फेब्रुवारी २०१७ रोजी आपल्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. प्राथमिक व माध्यमिक वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांनी मोठया प्रमाणावर या प्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यांच्या राज्यव्यापी जिल्हा व तालुकानिहाय समित्या गठीत करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी सराव आणि शिक्षकांसाठी प्रशिक्षण असा दुहेरी लाभ या परीक्षांमुळे होईल. ही परीक्षा राज्य शासनाच्या परीक्षेनंतरची सर्वात मोठी परीक्षा होईल याचा आटोकाट प्रयत्न राहील. सरकारी शाळेतील मुलांसाठी कमी फीस आहे याची नोंद घ्यावी. सरकारी शाळेतील जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा होईल याकडे विशेष लक्ष दिले आहे. तरी हा संदेश त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचते करावे.
शासनाची स्कॉलरशिप परीक्षा साधारपणे मार्च मध्ये असते त्याच्या एका महिन्यापूर्वी ही स्कॉलरशिप परीक्षेची रंगीत तालीम होय.
*महाएक्साम ही परीक्षा कोणी द्यायची ?*
जे विद्यार्थी शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेला बसले आहेत तेच विद्यार्थी
*महाएक्साम ही परीक्षा का द्यायची ?*
1) विद्यार्थ्यांनी आपली राज्यव्यापी स्पर्धा कोणाशी आहे हे जाणून घेण्यासाठी
2) आपली परीक्षेची तयारी किती झाली आहे हे जाणून घेण्यासाठी
3) परीक्षेत आपणास किती गुण मिळू शकतात याची प्रत्यक्ष चाचपणी करण्यासाठी
4) या बरोबरच परीक्षेचे हुबेहूब वातावरण कसे असेल ते जाणून घेण्यासाठी
5) स्कॉलरशिप परीक्षेची भीती घालवण्यासाठी
6) जर आपण कुठे कमी पडत आहोत असे वाटत असेल तर त्या भागावर विशेष लक्ष देता येईल.
या विषयी अधिकच्या माहिती साठी खालील website वर क्लिक करा
http://mahaexam.org.in
यासाठी आपल्या जिल्हा आणि तालुका समन्वयकाना संपर्क करा आणि आजच आपला महाएक्साम साठी प्रवेश निश्चित करा
आपलाच
नासा येवतीकर
लातूर विभाग समन्वयक
09423625769
( जिल्हा आणि तालुका समन्वयकानी सदरील पोस्ट आपल्या ग्रुप वर आपल्या नावाने share करावे. - संयोजक )
No comments:
Post a Comment